पाचोरा प्रतिनिधी | राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त येथे विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असून या संदर्भातील नियोजनाची बैठक नुकतीच पार पडली.
येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बैठक माजी आमदार दिलीप वाघ यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या बैठकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात येणार्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. यानिमित्त गावांमध्ये आरोग्य शिबिर, विकास कामांचे उद्घाटन, वृक्षारोपण असे विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. शरद पवार यांचा १२ डिसेंबरला वाढदिवस असून यानिमित्त ६ ते ११ डिसेंबर या काळात विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यासंदर्भात नुकतीच बैठक बोलावण्यात आली होती. राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी या सर्व उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन दिलीप वाघ यांनी याप्रसंगी केले.
बैठकीला विधानसभा क्षेत्र प्रमुख नितीन तावडे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, विजय पाटील, शहराध्यक्ष अझहर खान, कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य प्रशासक रणजीत पाटील, पंचायत समिती गटनेते ललित वाघ, शालिग्राम मालकर, नगरसेवक भूषण वाघ, सुचेता वाघ, डॉ. पी. एन. पाटील, सीताराम पाटील, श्याम भोसले, अरुण सोनवणे, भूषण सोनवणे, भडगाव तालुकाध्यक्ष रेखा पाटील, शहराध्यक्ष हर्षा पाटील, पाचोरा तालुकाध्यक्ष रेखा पाटील यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.