पाचोरा प्रतिनिधी । पाचोरा तालुका संजय गांधी समिती नुकतीच जाहीर झाली असून या समितीच्या अध्यक्षपदी शिवसेना शहर प्रमुख किशोर बारावकर यांची नियुक्ती झाली. आ. किशोर पाटील यांच्या शिफारशी नुसार पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या समितीला मंजुरी दिली असून याबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे अधिकृत पत्र प्राप्त झाले आहे.
संजय गांधी योजने अंतर्गत विधवा महिला, अपंग किंवा निराधार व्यक्तींना दरमहा शासना मार्फत विविध प्रकारच्या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येतो. यासाठी पदसिद्ध शासकीय अधिकाऱ्यांसोबतच अशासकीय सदस्यांची निवड केली जाते. पाचोरा तालुक्यासाठी गठीत करण्यात आलेल्या संजय गांधी समिती मध्ये अध्यक्षपदी किशोर बारावकर यांचेसह सदस्य म्हणून मुराद तडवी (रा.बांबरुड ता. पाचोरा), मंदाकिनी पाटील (रा.बांबरुड ता.पाचोरा), महेंद्र अहिरे (सारोळा ता.पाचोरा), मुख्तारशहा मोहम्मदशहा (पाचोरा), रविंद्र गीते (पिंपळगाव हरे.), सागर पाटील (नगरदेवळा), शालीग्राम मालकर (पिंपळगाव हरे.), प्रविण पाटील (लोहारी), धनराज विसपुते (वरखेडी) यांची अशासकीय सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली.
शासकीय प्रतिनिधी म्हणून पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अतुल पाटील तर सदस्य सचिव म्हणून तहसिलदार कैलास चावडे यांची शासकीय सदस्य म्हणून निवड जाहीर झाली आहे. दरम्यान अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर प्रतिक्रिया देतांना बारावकर म्हणाले की, आमदार किशोर पाटील यांनी माझ्यावर दाखवलेला विश्वासास आपण सार्थक ठरवणार असून गरजूंना या समितीच्या माध्यमातून सेवा देण्याचा आपला प्रयत्न असणार असल्याचे त्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.