पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | पाचोरा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या निरीक्षकपदी प्रा. भागवत महालपुरे तसेच सहानिरीक्षक पदी संजय एरंडे यांची निवड करण्यात आली.
आगामी काळात होवु घातलेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका निवडणुकीसाठी या दोघांची जबाबदार निरीक्षक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील यांचे आदेशाने तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते माजी आमदार दिलीप वाघ यांचे शिफारशीवरून ही निवड करण्यात आली आहे. या प्रसंगी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मार्गदर्शक संजय वाघ तसेच विधानसभा क्षेत्र अध्यक्ष नितीन तावडे, जिल्हा उपाध्यक्ष पी. डी. भोसले, तालुका अध्यक्ष तथा मा. नगरसेवक विकास पाटील, वासुदेव महाजन, भूषण वाघ, दत्ता पाटील, विनय जकातदार, कृ. उ. बाजार समितीचे प्रशासक रणजीत पाटील, शहराध्यक्ष अझहर खान, भडगाव शहराध्यक्ष श्याम भोसले, शहर कार्याध्यक्ष विनोद पाटील, युवक शहर अध्यक्ष सुदर्शन सोनवणे, हारुण देशमुख, ए. बी. अहिरे, अपूर्व थेपडे, संजय सूर्यवंशी, विनोद दांडगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.