पाचोरा शिवसैनिकांकडून नारायण राणेंचा पुतळा जाळून निषेध

पाचोरा प्रतिनिधी । नारायण राणे यांच्या वक्तव्याने आक्रमक झालेल्या पाचोरा शिवसैनिकांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात नारायण राणेला चप्पला व बूटांचा हार घालून पुतळा जाळून निषेध करण्यात आला असून गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, दि.23/8/20 21 रोजी महाड येथे जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान पत्रकार परिषदेत बोलताना केंद्रीय मंत्री नारायण तातोबा राणे याने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या संदर्भात व त्यांना उद्देशून बोलताना राणे म्हणाले की, “बाजूला एखादा सेक्रेटरी ठेव, आणि विचारून बोल म्हणावे. त्यादिवशी नाही का, किती वर्ष झाली देशाला स्वातंत्र्य मिळून? अरे हिरक महोत्सव काय? मी असतो तर कानाखाली चढवली असती.” असे बेजबाबदारपणाचे विद्यमान मुख्यमंत्र्यांचा सार्वजनिक अपमान करणारे आणि सार्वजनिक आगळीक होण्यास सहाय्य होईल असे वरील विधान राणेंनी केले आहे. तसेच वरील वक्तव्य करून, तसेच वर्गा वर्गांमध्ये शत्रुत्व, द्वेषभाव किंवा दुष्टावा निर्माण करणारे द्वेषभाव वाढविणारे असे वरील विधान राणे यांनी केले आहे. तसेच वरील वक्तव्य करून राणेंचा समाजा समाजात व महाराष्ट्रातील शांत जनमानसात दुष्टवा व तेढ निर्माण करण्याचा दूषित हेतू आहे. त्यांच्या वरील वक्तव्यामुळे महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा या चिथावणीखोर वक्तव्याची दखल घेऊन आपण नारायण तातोबा राणे यांच्यावर तातडीने भारतीय दंड विधान कायद्यातील कलम ५०५ (२), १५३ ब(१)(क) खाली गुन्हा दाखल करावा. 

तशी प्रथम खबर अहवालाची प्रत आम्हाला द्यावी व आरोपी नारायण तातोबा राणे याला अटक करून त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करावी. आरोपी नारायण राणे यांनी केलेले वक्तव्य आम्ही पाचोरा येथे मराठी न्यूज चॅनल टीव्ही नाईन वर बघितले त्याची लिंक सोबत देत आहे. या फिर्यादीच्या खाली फिर्यादी म्हणून उपजिल्हाप्रमुख ऍड. अभय शरद पाटील, माजी नगराध्यक्ष गणेश भिमराव पाटील, जि.प. गट नेता मनोहर गिरधर पाटील, शहरप्रमुख किशोर बारावकर, तालुका प्रमुख शरद रमेश पाटील, भागवत पंडित पाटील शेतकरी सेना जिल्हाप्रमुख अरुण पाटील, सुरेश गणसिंग पाटील, माधव धना पाटील, गजू पाटील, रमेश बाबुराव पाटील, पीपल्स बँक संचालक अविनाश कुडे, गणेश देशमुख, अरुण तांबे, प्रवीण ब्राह्मणे, राहुल पाटील, वाल्मिक जाधव, कैलास पाटील, पदमसिंह पाटील, राजेश प्रजापत, तुषार जगताप, सचिन जगताप, जावेद शेख, शहर प्रमुख बंडू चौधरी, उपशहर प्रमुख अनिल सावंत, छोटू चौधरी, नगरसेवक दादाभाऊ चौधरी तात्या चौधरी, घनश्याम महाजन, राजू चौधरी, मोतीलाल चौधरी यांच्यासह अनेक शिवसैनिक यांनी फिर्यादी म्हणून सही केली आहे. याप्रसंगी उद्धव साहेब आगे बढो! किशोर आप्पा आगे बढो ! आवाज कुणाचा शिवसेनेचा! जय भवानी जय शिवाजी! इत्यादी घोषणा देण्यात आल्या. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

Protected Content