शिंदाड येथे विक्रमी लसीकरण

पाचोरा, प्रतिनिधी | जिल्हा परिषद सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नातून शिंदाड गावामद्ये एका दिवशी विक्रमी ८५० ग्रामस्थांचे लसीकरण करण्यात आले.

शिंदाड ता.पाचोरा येथे दि. ८ रोजी सुमारे ८५० नागरिकांना कोरोनाची लस एकाच दिवशी देण्यात आली शिंदाड – पिंपळगाव जि.प .गटाचे सदस्य मधुकर काटे यांच्या प्रयत्नातून व शिंदाड ग्राम पंचायत यांचे सहकार्याने हा कोरोना लसीचा महाकुभ शांततेत पार पडला. येथील मातोश्री हॉल मध्ये गेण्यात आलेल्या लसीकरणासाठी शिंदाड सह परिसरातील नागरिकांनी कोव्हीशील्ड लस देण्यात आली. यात पहिला डोस ६५० तर दुसरा डोस २०० नागरिकांना देण्यात आला.

सकाळी ९ वाजता जि. प. सदस्य मधुकर काटे, सरपंच ज्ञानेश्वर तांबे, उपसरपंच नरेंद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थीतीत लसीकरणाला सुरवात झाली. नागरिकांनी महिला व पुरुष स्वतंत्र रांगेत उभे राहून टोकन बुक केले व ऑनलाइन बुकिंग करण्यात आले. सुमारे ५ वाजेपर्यंत ८५० नागरिकांनी शांततेत लसीकरण करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. शेखर पाटील, डॉ. मयूर पाटील, डॉ. राहुल महाजन, आरोग्य सेवक योगेश पाटील, राजेंद्र भिवसने, अशोक धुरांदरे, गोकुळ शिरसाठ, लहू बोरसे, गजानन ढाकरे,आरोग्य सेविका एस. बी. दुबेले, व्ही. एस. क्षीरसागर, व्ही. आर. परदेशी, पी. के. तायडे, सुनिता मोरे, रमेश चौधरी यांनी लसीकरण यशस्वीपणे पूर्ण केले.

यासाठी ग्राम पंचायत सदस्य संदिप सराफ, स्वप्नील पाटील, विलास पाटील, इंदल परदेशी, धनराज पाटील, विजय पाटील, बापु मुठे, विनोद तडवी, श्रीराम धनगर, अनिल कोठावदे, तेजस परदेशी, अशोक पाटील, अर्णव कोठावदे, अमोल व्यवहारे तसेच समाज विकास विद्यालय, प्राथमिक शाळेचे शिक्षक, अंगणवाडी कर्मचारी, आशा स्वयंसेविका, तसेच मातोश्री हॉल चे संचालक अशोक पाटील तसेच ग्राम पंचायत कर्मचारी व ग्रामस्थांनी मोलाचे सहकार्य केले.

Protected Content