पाचोरा पिपल्स बँकेची निवडणूक हेतुपुरस्कर लांबणीवर टाकत असल्याचा आरोप

 

 

 

pachoiora

 

पाचोरा (प्रतिनिधी) पिपल्स बँकेच्या निवडणूकीसाठी तारिख निश्चित झाली असून याकडे मुद्दाम दुर्लक्ष केला जात असल्याचा आरोप बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनतर्फे करण्यात आला आहे.

बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनने आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, येथील पिपल्स बँकेच्या निवडणूकांची तारिख निश्चित झालेली असून याकडे डी.डी.आर.जळगाव तसेच पाचोरा पिपल्स बॅकेचे मुख्य प्रशासक ए.आर.शहा हे जाणीवपूर्वक वेळ वाया घालवत आहे. तसेच प्रशासक सदस्य प्रशांत अग्रवाल व पुर्वीपासून बॅकेचेच वकिल असलेले व आता प्रशासक म्हणून सदस्य अॅड. प्रशांत कुलकर्णी हे बँकेची फसवणूक करित आहे.

तसेच निवडणुक कार्यक्रम वेळेत घेण्यासाठी जाणीव पुर्वक टाळाटाळ करित आहेत. सर्व बॅक ग्राहकांनी या प्रशासकांना बॅकेत जावून जाब विचारूण बॅकेला वाचवण्याचा प्रयत्न करावा अशी विनंती देखील बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनतर्फे करण्यात आली आहे. कारण बॅकेची निवडणुक प्रक्रिया लवकर पार पाडावी असे पत्र (दि.14 जून) रोजी दिल्यावरही प्रशासक बँकेची निवडणूक का लावत नाही? असा प्रश्न ग्राहकांच्या मनात निर्माण होत आहे. तसेच बॅकेची निवडणूक योग्य वेळेवर न झाल्यास बॅक प्रशासकांना व जिल्हाउपनिबंधकांना लवकरच बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनतर्फे घेराव घालण्यात येऊन होण्याऱ्या विपरीत परिणामास अधिकारी जबाबदार राहतील, असे बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ पाटील यांनी सांगितलेले आहे.

Protected Content