अक्षयतृतीयेच्या खरेदीसाठी पाचोरा बाजारपेठेत प्रचंड गर्दी (व्हिडीओ)

 

fda882f7 9571 40d0 8299 ab2dbdbe9569

 

पाचोरा (प्रतिनिधी) येथील साडेतीन मुहूर्तापैकी एक आणि अतिशय शुभ मानल्या जाणाऱ्या अक्षयतृतीयेच्या एक दिवसआधी बाजारपेठेत घागर, फळे, पूजा तसेच विविध आवश्यक वस्तू आणि किराणा मालाच्या खरेदीसाठी प्रचंड गर्दी उसळली होती. आखाजीसाठी माहेरी आलेल्या लेकींसाठी खरेदी करणायांचेही प्रमाण मोठे असल्याने लाखोंची उलाढाल होणार असल्याचे चित्र आहे.

 

घागरींना मागणी

 

आज सकाळपासूनच घागर बाजारात मोठी गजबज होती. गेरू रंगातील लहान मोठ्या आकाराच्या व आकर्षक घागरीचे भाव विचारणाºया महिला, पुरूष व त्यांच्याकडून होणारी घासाघीस ऐकण्यासारखी ठरत होती. विक्रेते काडीने घागर ‘टकटक’ वाजवून तिच्या पक्केपणाची खात्री करून देत आहेत. लहान घागर ५० रूपये तर मोठी घागर ६० – ७० रूपयांना विक्री होत होती.

 

आंब्याचा खरा सिझन

 

आंब्याचा खरा सिझन अक्षयतृतीयेपासूनच सुरू होतो. ८० ते १४० रूपये किलोने आंब्यांची विक्री होत होती. अक्षयतृतीयेचा मुहूर्त साधून वाहन टीव्ही, मोबाईल तसेच सोने खरेदी, नवीन व्यवसायाचा शुभारंभ यासाठीही अनेकांची धावपळ सुरू दिसत आहे. वाहतुकीची कोंडी ४३ अंशाचा पारा गाठलेले कडक ऊन व हवेतला उष्मा यांना न जुमानता शहरी व ग्रामीण भागातील स्त्री-पुरूषांनी खरेदीसाठी गर्दी दिसत आहे. छत्रपती शिवाजी चोक जामनेर रॉड आठवडे बाजार येथे मोठ्या प्रमाणावर विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. त्यामुळे गर्दी उसळली दिसत आहे. त्यामुळे वाहनधारकांपेक्षा पायी चालणाऱ्यांना मार्ग काढणे सोयीचे होताना दिसत होते. एवढी बाजारात गर्दी होती. अक्षयतृतीयेच्या या दिवशी घरोघरी पितरांचे श्राद्ध केले जाते. त्यांना वर्षभर पाणी प्यायला मिळावे म्हणून घागर भरली जाते. पितरांसाठी पान वाढले जाते. त्यासाठी पुरणाची पोळी, आंब्याचा रस,भजी यासह अनेक पदार्थ केले जातात.

 

Add Comment

Protected Content