पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा – भडगाव रोटरी क्लब व वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या पहाटे ५ वाजेपासून ते सकाळी ८ वाजेपर्यंत शहरातील पुनगाव रोडवरील निर्मल इंटरनॅशनल (प्रि प्रायमरी) स्कुलमध्ये नाट्य ब्रम्ह गृप प्रस्तुत पाडवा पहाट या संगीतमय मेजवानीचे आयोजन करण्यात आले आहे.
या पाडवा पहाट संगीतमय मेजवानीत गायक गोविंद मोकाशी, गायिका देवांगिनी मोकाशी, ऐश्वर्या परदेशी, पुनम पाटील, समृद्धी जोशी, तबला वादक, पांडुरंग पाटील, टाळ वादक मनोज पाटील, की बोर्ड वादक गौरव काळंगे, ऑक्टोपॅड वादक कैलास निकम यांच्या कलागुणांची मैफील रंगणार आहे. कार्यक्रमाचे निवेदक म्हणून महेश कौंडिण्य हे असणार आहेत.
या पाडवा पहाट संगीतमय मेजवानीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन पाचोरा – भडगाव रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. अमोल जाधव, सचिव रो. गोरख महाजन व प्रोजेक्ट डायरेक्टर तथा निर्मल इंटरनॅशनल स्कुलच्या अध्यक्षा वैशाली नरेंद्रसिंह सुर्यवंशी यांनी केले आहे.