समग्र शिक्षा अभियानाचे दोन कर्मचारी जखमी

 

पाचोरा, प्रतिनीधी ।येथील समग्र शिक्षा अभियानात कार्यरत असलेले दोघ कर्मचारी पाचोरा येथून भडगाव येथे जात असतांना बांबरूड (महादेवाचे) येथे त्यांच्या मोटरसायकलचा अपघात होऊन जखमी झालेत.

समग्र शिक्षा अभियानात कार्यरत रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एम. आय. एस. काॅर्डीनेटर योगेश अहिरवार हे भडगाव येथे अतिरिक्तपदाचे काम करण्यासाठी पाचोर्‍याहुन भडगाव येथे मोटरसायकलवर जात असतांना बांबरूड (महादेवाचे) फाट्याजवळ एक मोटरसायकलस्वार रस्त्त्यात आडवा आल्याने अपघात झाला. या अपघातात योगेश अहिरराव यांच्या डोळ्याला तर नरेंद्र शिरसाळे यांच्या हाताला दुखापत झाली.

समग्र शिक्षा अभियानात कंञाटी मानधन तत्वावर काम करणारे रोखपाल नरेंद्र शिरसाळे व एम. आय. एस. काॅर्डीनेटर योगेश अहिरराव यांच्याकडे पाचोरा तालुक्यासह भडगाव तालुक्याचाही अतिरिक्त कारभार सोपविण्यात आला आहे. त्यात अहिरराव यांच्याकडे चाळीसगावही आहे. काही दिवसांपासुन संपुर्ण महाराष्ट्रातील समग्र शिक्षा अभियानाचे कंञाटी कर्मचारीसोडुन फक्त आणि फक्त जळगाव जिल्ह्यातील या कर्मचार्‍यांना बायोमॅट्रीक प्रणालित घेण्याचा धडाका सुरू आहे. याबाबत कोणताही लेखी आदेश नसतांनाही या कर्मचार्‍यांचे माहे नोहेंबर – २०२० चे मानधन थांबविण्यात आले आहे. एकीकडे कंञाटी पद आणि दुसरीकडे बायोमॅट्रीकची टांगती तलवार डोक्यावर घेवुन हे कर्मचारी काम करित आहे. अशात शाळाभेटी व अतिरिक्त तालुक्यांवर काम करतांना त्यांची तारेवरची कसरत होत आहे. अशात आज या दोघां तरूणांचा झालेला अपघात मनात भीती निर्माण करणारा आहे. या अपघातात ही दोघे तरूण बचावली असुन यांच्यावर पाचोरा ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकिय अधिकारी डाॅ. अमित साळुंखे यांनी प्रथमोपचार केला. दरम्यान घटना घडताच भडगाव येथील शिक्षक टिकाराम पाटील, डाटा एन्ट्री आॅपरेटर किशोर पुजारी, समावेशित शिक्षण तज्ञ निंबा परदेशी यांनी घटास्थळाहुन दोघा जखमींना पाचोरा येथे आणले. पाचोर्‍याला डाटा एन्टी आॅपरेटर सुनिल शिवदे व आरोग्य विभागाचे चंद्रकांत पाटील यांनी जखमींना उपचारास नेण्यास मदत केली. दोघ जखमी यांची प्रकृती बरी आहे.

Protected Content