डोक्यात अवजड वस्तू मारून तलाठी पत्नीचा खून; पोलीस पती गजाआड

पाचोरा नंदू शेलकर । चारित्र्यावर संशय घेत तलाठी पत्नीचा अवजड वस्तु डोक्यात मारुन पतीनेच हत्या केल्याची घटना शहरात घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलीस असणार्‍या तिच्या पती विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन त्याला अटक करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शहरातील मौर्या कन्ट्रक्शन मधील रहिवासी तथा तालुक्यातील माहेजी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अरुणा नितीन पवार (वय – ४२) यांचे भाऊ हे मुंबई येथे पोलिस दलात सेवेत असतांना त्यांचा चार वर्षांपूर्वी मृत्यू झाला होता. भावाच्या मृत्यु संबंधीचे कागदपत्रे गोळा करण्यासाठी अरुणा ह्या मुंबई येथे गेल्या असता त्यांची भेट पोलिस दलात नोकरीस असलेले नितीन मोतीलाल पवार यांचेशी झाली. नितीन यांने अरुणा हिचा विश्‍वास संपादन करुन माझा पहिला विवाह झाला असुन माझी पत्नी माझ्यासोबत राहत नाही व मी पण आपल्या समाजाचा आहे असे खोटे सांगुन अरुणाला विवाहाची मागणी केली. यानंतर त्यांचा २२ सप्टेंबर २०१७ मध्ये विवाह झाला होता.

विवाहानंतर नितीन पवार हा नियमित अरुणा हिच्या चारित्र्यावर संशय घेत असुन तिचा शारिरीक व मानसिक छळ करीत असे. अरुणा हिने सदरचा प्रकार आपल्या आईस सांगितल्यानंतर आईने नितीन याच्या स्वभावात बदल होईल असे सांगितले. अरुणा ही तलाठी पदावर कार्यरत असल्यामुळे तिला तहसिल कार्यालयातुन ऑफिस कामांबाबत मिटींग संदर्भात व शेतकर्‍यांचे फोन येत असत. याचा नितीनला राग येवुन तिच्या चारित्र्यावरच संशय घेत असे. शेवटी याच विषयावरुन नितीन व अरुणामध्ये दि. २९ रोजी दुपारी दोनच्या सुमारास भांडण झाले त्यात नितीन मोतीलाल पवार याने अवजड वस्तु डोक्यात मारुन खुन केला.

पोलिस दलात असल्यामुळे नितीन याने पळवाट काढण्याचा प्रयत्न करत शेजारील नागरिकांना खोटी बतावणी करत अरुणा ही घरातील पायरी वरुन पाय घसरुन पडली व तिच्या डोक्याला जबर मार लागला आहे. असे सांगुन अरुणा हिस खाजगी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

दरम्यान, पोलिसांनी नितीन यास खाक्या दाखवताच. नितीन हा पोपटासारखा बोलु लागला व मीच अरुणा हिला मारले अशी कबुली दिली. यावेळी पोलिस उपअधीक्षक ईश्‍वर कातकडे, पोलिस निरीक्षक किसनराव नजन पाटील, पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय नलावडे, सहाय्यक फौजदार रामदास चौधरी, अजय मालचे, मुकुंद परदेशी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता या खूनाचा उलगडा झाला आहे.

Protected Content