पाचोरा नगरपरिषदेची प्लास्टिक बंदीबाबत धडक मोहीम – ५० हजार रुपये दंड वसूल

पाचोरा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पाचोरा नगरपरिषदेने ‘प्लास्टिकमुक्‍त पाचोरा शहर’ या अभियानांतर्गत आज शहरातील प्लास्टिक पिशव्‍या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविली. यातून सुमारे ४० किलो प्लास्टिक जप्त करून ५० हजार रुपये दंड वसूल करण्‍यात आला.

महाराष्‍ट्र राज्‍य प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सचिव यांचेकडील परिपत्रक महाराष्‍ट्र प्लास्टिक व थर्माकोल अविघटनशील वस्‍तूंचे (उत्‍पादन, विक्री, वापर, वाहतूक, हाताळणी, साठवणूक) अधिसुचनेनूसार प्लास्टिक कॅरी बॅग, नॉन ओव्‍हन पिशव्‍या वापरास बंदी घातलेली आहे.

त्‍या अनुषंगाने पाचोरा नगरपरिषदेने ‘प्लास्टिकमुक्‍त पाचोरा शहर’ या  अभियानांतर्गत आज दि. ५ जुलै रोजी पाचोरा शहरातील विविध प्लास्टिक पिशव्‍या (सिंगल युज) विक्री करणा-या दुकानांवर धडक मोहिम राबविण्‍यात आली.

नगरपरिषदेकडून शहरातील आस्‍थापना, दुकाने, फेरीवाले, हॉटेल्‍समध्‍ये अनाधिकृतपणे व शासनाने बंदी घातलेल्‍या प्‍लॅस्‍टीक पिशव्‍या जप्‍त करण्‍याची धडक मोहिम राबवून सुमारे ४० किलो प्लास्टिक जप्त करून ५० हजार रुपये दंड वसूल करण्‍यात आला. यापुढे देखील मोहिम सुरुच राहणार असून सुचना देऊन देखील पुन्‍हा पुन्‍हा बंदी असलेल्‍या प्लास्टिक पिशव्‍या विक्री करणा-या दुकानदारांविरुध्‍द यापुढे कडक कारवाई केली जाणार आहे. नागरिकांनी देखील प्‍लॅस्‍टीक पिशव्‍यांचा वापर पूर्णपणे बंद करुन घरुनच कापडी पिशवी घेऊन बाहेर पडावे. शहरातील सामाजीक संस्‍थांशी संपर्क करुन प्लास्टिक बंदी मोहीमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा तसेच प्लास्टिक वापराबाबत काही शंका असल्‍यास व्‍यापारी बांधवांनी नगरपरिषदेत येऊन शंका निरसन करण्‍याचे देखील आवाहन मुख्‍याधिकारी तथा प्रशासक शोभा बाविस्‍कर यांनी केले.

मोहिमेत या पथकाची करण्यात आली नेमणूक –

लिडिंग फायरमन राजेश कंडारे, प्रकाश लहासे, नरेश आदिवाल, विनोद सोनवणे, भिकन गायकवाड, सतीष जगताप, आकाश खैरनार, विजय ब्राह्मणे, अमोल अहिरे, बापु ब्राह्मणे, सुखदेव ठाकूर, अर्जुन सूर्यवंशी

 

Protected Content