दिलीप वाघ यांनी स्वीकारली प्रशासक पदाची सूत्रे

0
51


पाचोरा प्रतिनिधी । येथील कृषी उत्पन्न बाजार समितीचे मुख्य प्रशासक माजी आमदार दिलीप वाघ यांच्यासह सदस्यांनी आपल्या पदाचा कार्यभार सांभाळला.

पाचोरा-भडगाव तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रशासक पदी महा विकास आघाडीच्या सात पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती जाहीर झाल्यानंतर शनिवारी मुख्य प्रशासक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार दिलीप वाघ तर प्रशासक म्हणून अ‍ॅड. अभय पाटील, रणजीत पाटील, प्रा. शिवाजी पाटील, युवराज पाटील, प्रा.चंद्रकांत धनवडे, अनिल महाजन यांनी प्रशासक पदाचा पदभार स्वीकारला.

यावेळी दिलीप वाघ यांच्यासह सदस्यांचा बाजार समितीचे सचिव व कर्मचारी, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष रमेश अग्रवाल, सचिव राजेश पटवारी, अडत असोसिएशनचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, सचिव एम. डी. पाटील आदींनी सत्कार केला.

याप्रसंगी पाचोरा तालुका सहकारी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय वाघ, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील, तालुकाध्यक्ष विकास पाटील, शहराध्यक्ष सतीश चौधरी, ए. बी. अहिरे, अविनाश सुतार, नगरसेवक वासुदेव महाजन, अशोक मोरे, विनय जकातदार, अजहर खान, कृउबा सचिव बी.बी. बोरुडे, उपसचिव एन.डी. पाटील, पी.एस. देवरे, व्ही.पी. पाटील उपस्थित होते.