अमीन पिंजारी यांना एआयसीपीईचा पुरस्कार प्रदान

पाचोरा प्रतिनिधी | येथील टॅली प्रोफेशनल अकॅडमीचे संचालक अमीन पिंजारी यांना एआयसीपीईतर्पे बेस्ट टीचर पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले.

येथील नवकार प्लाझा मधील टॅली प्रोफेशनल अकॅडमीचे संचालक अमिन पिंजारी यांना ऑल इंडिया कौन्सिल फॉर प्रोफेशनल एक्सलन्स (ए. आय. सी. पी. ई.) यांच्या कडून शिक्षक दिनाच्या निमित्ताने बेस्ट टिचर अवार्ड – २०२१ देण्यात आला.

अमीन पिंजारी यांनी टॅली प्रोफेशनल अकॅडमी ही सन – २०१६ ला सुरू करण्यात आली होती. या इन्स्टिट्यूट मध्ये आजवर पाचोरा शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना टॅली जी. एस. टी. कोर्स संपूर्ण व्यावसायिक जसे व्यापार व व्यावसायिकांना प्रत्यक्ष अकाउंटींग चे काम करावे लागते. तसेच विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यात येते. यात विद्यार्थ्यांसह बरेच व्यापारी वर्ग स्वतःचे व्यवसायाचे अकाउंटिंगचे कामे स्वतः करीत आहे. बेस्ट टीचर अवार्ड मिळाल्याबद्दल पिंजारी यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!