जळगाव प्रतिनिधी । केंद्र शासनाच्या निर्देशानुसार 12 ते 18 डिसेंबर या कालावधीत संपुर्ण भारतभर ‘फिट इंडिया मूव्हमेंट’ राबवली जात आहे. त्याच्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांना क्रीडा विषयाचे ज्ञान होऊन क्रीडाविषयक वातावरण निर्माण व्हावे. या उद्दिष्टाने केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात क्रीडा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.
त्यात प्रामुख्याने योगाभ्यास, पारंपारिक खेळ (लंगडी, लगोरी, लेझीम, संगीत खुर्ची आदी), सामूहिक कवायती, धावणे, कबड्डी, खो-खो, फुटबॉल आदी खेळांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धेसाठी मुख्या.रेखा पाटील यांचे मार्गदर्शन लाभले तर सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.