सावधान : दिवसभरात राज्यात ४० हजारांवर कोरोना रूग्ण !

मुंबई प्रतिनिधी | राज्यातील कोरोना बाधीतांची संख्या पुन्हा एकदा वाढीस लागली असून गेल्या २४ तासांमध्ये राज्यभरात तब्बल ४० हजार ९२५ नवीन बाधीत रूग्णांची नोंद झाली असून यात निम्यापेक्षा जास्त पेशंट हे मुंबईतील आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना बाधीतांच्या संख्येत वाढ होतांना दिसून येत आहे. राज्यात आज ४० हजार ९२५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. सुदैवाने आज एकाही ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली नाही आतापर्यंत ८७६ ओमायक्रॉनबाधितांची नोंद राज्यात झाली आहे. त्यापैकी ४३५ रुग्ण ओमायक्रॉनमुक्त झाले आहे. दरम्यान, तर १४,२५६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. विशेष बाब म्हणजे ३१ डिसेंबर रोजी राज्यात ८०६७ पेशंट होते. तर यानंतर सहा दिवसांमध्येच रूग्णसंख्या तब्बल पाच पटीने वाढल्याने आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे.

गेल्या चोवीस तासांमध्ये मुंबईत २० हजार ९७१ रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ८ हजार ४९० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ज्यामुळे मुंबईत कोरोनावर मात केलेल्या रुग्णांची संख्या ७ लाख ६४ हजार ५३ वर पोहोचली आहे. त्यामुळे मुंबईचा रिकव्हरी रेट ८७ टक्के इतका झाला आहे. तर मागील २४ तासांत ६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या १६ हजार ३९४ झाली आहे. सध्या मुंबईत ९१ हजार ७३१ सक्रीय रुग्ण आहेत. तर दुसरीकडे राज्याचा मृत्यूदर २.०७ टक्के झाला आहे. राज्यात सध्या ८७ हजार ५०५ रुग्णांवर उपचार सुरु असून आतापर्यंत ६५ लाख ४७ हजार ४१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या राज्यात ७ लाख ४२ हजार ६८४ व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर १४६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

Protected Content