संतापजनक : अनैतिक कृत्य करण्यास अल्पवयीन मुलीला भाग पाडले !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणारी १६ वर्षीय अल्पवयीन मुलीला वेगवेगळ्या लोकांशी अनैतिक कृत्य करण्यास दबाव टाकून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यातीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ७ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजता नितू उर्फ जोया राजू बागडे रा. जळगाव, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव यांनी अल्पवयीन मुलीला चाळीसगाव येथे बोलावून तिला सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोब अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. त्यानंतर तिला घरी पाठविले. त्यानंतर पुन्हा १० फेब्रुवारी रोजी कपडे व मोबाईल देण्याचे आमिष दाखवत चाळीसगावला घेवून गेले. तिथे २३ फेब्रुवारीपर्यंत रोज रात्री पुन्हा सोडा पाजून वेगवेगळ्या लोकांसोबत अनैतिक कृत्य करण्यास भाग पाडले. पोलीस येणार असल्याचे सांगून तिघांनी तिला रेल्वेत बसवून जळगावला पाठविले. घाबरलेल्या अवस्थेत तिने हा सगळा प्रकार आईला सांगितले. पिडीत मुलीने आईसह एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तिघांविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून नितू उर्फ जोया राजू बागडे रा. जळगाव, ज्योती चंद्रकांत सरदार आणि चंद्रकांत शंकर सरदार दोघे रा. आनंदवाडी, चाळीसगाव यांच्याविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गिरासे करीत आहे.

Protected Content