लोणवाडी येथे दूषित पाण्यामुळे साथीच्या आजारांचे थैमान

बोदवड-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील लोणवाडी येथील ग्रामपंचायती मार्फत गावात अशुद्ध पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होत असल्यामुळे साथीचे आजार पसरले असून जनतेचे आरोग्य धोक्यात आल्याचे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की बोदवड तालुक्यातील लोणवाडी येथे सध्या साथीचे आजार मोठ्या प्रमाणात पसरले आहेत. गावामध्ये पुरवठा होणारे पाणी अशुद्ध असून यात जंतू दिसत आहे. या बाबीकडे ग्रामपंचायत दुर्लक्ष करीत असल्यामुळे जनतेचे आरोग्य धोक्यात आले आहे.

परिणामी सर्व महिला संतापल्या असून जर शुद्ध पाणी मिळाले नाही व ओडीओचे पाणी मिळाले नाही तर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. परिणामी लोणवाडी ग्रामपंचायत ने पाण्यामध्ये टीसीएल पावडर वापरून ओडीए योजनेचे पानी त्वरित कसं सुरू करता येईल याकडे लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात येत आहे.

दरम्यान, गावातील गटारी तुटुंब कचर्‍यांनी भरलेले आहेत परिणामी पाणी जिथे तिथे साठून डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे मलेरिया टायफाईड सारखे आजाराला आमंत्रण दिले जाते. त्यामुळे ग्रामपंचायतीने याकडे सुद्धा लक्ष द्यावे व स्वच्छता ठेवावी अशी मागणी गावकर्‍यांकडुन मोठ्या प्रमाणात केली जात आहे.

Protected Content