जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा रागात आल्याने जळगाव शहरातील दादावाडी परिसरात महेंद्रकुमार पगारे (रा. दादावाडी) व त्यांच्या पत्नी पद्मिनी पगारे यांची कार अडवून शिवीगाळ करीत मारुन टाकण्याची धमकी दिल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील दादावाडी परिसरात महेंद्रकुमार पगारे हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. रविवारी ८ डिसेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास महेंद्रकुमार हे पत्नी पद्मीनी पगारे यांच्यासोबत कारमधून दादावाडी परिसरातून निघाले होते. यावेळी संशयित आरोपी नितीन जाधव रा. दादावाडी याने कारचा रस्ता आडविला. नोकरीच्या ठिकाणाहून बदली केल्याचा रागातून महेंद्रकुमार पगारे यांना अश्लिल शिवीगाळ केली आणि जीवेठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पद्मीनी पगारे यांनी सोमवारी ९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता जळगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार पोलीस ठाण्यात संशयित आरोपी नितीन जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संजय भालेराव करीत आहेत.