शासकीय वसतिगृहासाठी प्रवेशप्रकिया सुरु

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील १२ शासकीय वसतीगृहासाठी प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. वसतीगृहात प्रवेश मिळविण्यासाठी इच्छुक   विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करण्याचे आवाहन महाबळ येथील समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी केले आहे.

 

जिल्हयातील शैक्षणिक संस्थामध्ये प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील शालेय विद्यार्थी इयत्ता दहावी आणि अकरावी उत्तीर्ण विद्यार्थी तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील इतर शैक्षणिक / व्यवसायीक अभ्यासक्रमातील प्रथम व व्दितीय वर्षाच्या प्रवेशीत विद्यार्थ्याना समाज कल्याण विभागाच्या शासकीय वसतिगृहात प्रवेश घेता येईल. त्याचप्रमाणे, तालुका स्तरावर मुला मुलींचे शासकीय वसतिगृह येथे इयत्ता आठवीपासून ते  पुढील अभ्यासक्रमा करिता प्रवेश अर्ज वाटपाबाबतची प्रक्रिया सुरु झाली आहे.

 

यंदाच्या शैक्षणिक वर्षा करिता शालेय विद्यार्थ्यांनी 15 जुलै पर्यंत तर कनिष्ठ विभाग विद्यार्थ्यांनी 30 जुलै पर्यंत व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून, तसेच पदवी नंतरचे पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी 24 ऑगस्ट पर्यंत आणि व्यवसायीक अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया 30 सप्टेबर पर्यंत अर्ज सादर करावयाचे आहे. प्रवेशित विद्यार्थ्यांना शासनाकडून नाश्ता, भोजन, निवासाची सोय, शैक्षणिक साहित्य तसेच निर्वाह भत्ता देण्यात येतो.

 

विद्यार्थ्यांना ज्या वसतिगृहात प्रवेश घ्यायचा असेल त्यानी तेथुनच अर्ज प्राप्त करुन नमुद दिनांका पंर्यत आवश्यक त्या कागदपत्रांसह सादर करावेत. असे आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांनी प्रसिध्दीपत्रान्वये कळविले आहे.

 

Protected Content