Home राजकीय आमच्यावर आईचे संस्कार, मोदींवर वैयक्तिक टीका करणार नाही : शरद पवार

आमच्यावर आईचे संस्कार, मोदींवर वैयक्तिक टीका करणार नाही : शरद पवार


sharad pawar narendra modi
 

कोल्हापूर (वृत्तसंस्था) गांधी घराण्याच्या त्यागाची किंमत तुम्हाला कळली नाही तरी ती देशाला माहीत आहे. आम्हाला आमच्या आईने योग्य ते संस्कार दिले आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैयक्तिक आरोप केले असले. तरी मी मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींवर वैयक्तिक आरोप करणार नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवारांनी पलटवार केलाय. ते कोल्हापुरात आघाडीचे उमेदवार धनंजय महाडिक आणि राजू शेट्टींच्या प्रचारार्थ बोलत होते.

 

यावेळी पवार म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वैयक्तिक किंवा घराण्यावर आरोप करण्यापेक्षा दुष्काळ, शेतकरी आत्महत्यांवर बोलावे. त्यांनी पवार कुटुंबाची चिंता करू नये. ‘मोदी जिथे जात आहेत तिथं खाजगी टीका करत आहेत. परंतु मी मात्र असे करणार नाही. कारण मी माझ्या आईने दिलेल्या संस्कारांनी प्रभावित आहे. वैयक्तिक टीका आमच्या संस्कृतीत बसत नाही, असे म्हणतानाच पंतप्रधानांना राष्ट्रवादीच्या कौटुंबिक कलहाबाबत चिंता करण्याची गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच मोदी पुन्हा सत्तेवर आल्यास राज्यघटनेत बदल करून एक मताचा अधिकार उदध्वस्त करतील, अशी भीती व्यक्त करून केली. लोकसभा निवडणूक २०१९ च्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची राज्यातील ही पहिलीच प्रचार सभा नुकतीच वर्ध्यात पार पडली. त्यावेळी मोदी यांनी पवार परिवारावर टीका केली होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound