जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | के.सी.ई.सोसायटी संचलित ‘ओरिऑन इंग्लिश मीडियम स्टेट बोर्ड स्कूल’चा इयत्ता दहावीचा निकाल १०० टक्के लागला असून ९८.८० टक्के मार्क मिळवून शाळेत ३१५ विद्यार्थ्यांमध्ये मृदुला साळुंखेने प्रथम येत यश संपादन केले आहे.
शाळेतून सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत. या विद्यार्थ्यांमधून शाळेत प्रथम – मृदुला श्याम साळुंखे ९८.८० टक्के, द्वितीय – युक्त प्रशांत पाटील ९७.४० टक्के, दीक्षा संतोष चौधरी ९७.४० टक्के व सयाली विजय पाटील ९७.४० टक्के तर तृतीय – प्रणव किशोर सोनार ९७ टक्के, खुशबू मुकुंद खाचणे ९७ टक्के, रितिका दीपक महाजन ९७ टक्के व दिव्या दिलीप चौधरी ९७ टक्के मिळवून घवघवीत यश संपादन केले.
या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, प्राचार्य ब्रूस हेंडरसन यांनी विद्यार्थ्यांचे स्वागत केले.