जळगाव, प्रतिनिधी | के.सी.ई. सोसायटी संचालित ओरिऑन इंग्लिश मेडियम स्टेट बोर्ड स्कुल चा संघ अंडर १७ वयोगटातील क्रिकेटमध्ये विजयी झाला. म.न.पा. जिल्हा क्रीडा अधिकारी आयोजित जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती.
या स्पर्धा अनुभूति स्कुल मध्ये दि. १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान घेण्यात आल्या. अंतिम सामना ओरिअन स्टेट बोर्ड स्कुल विरुद्ध एम.जे.कॉलेज यांच्यामध्ये झाला. या स्पर्धेमध्ये ओरिअनच्या संघाचा कॅप्टन हर्षवर्धन मालू हा होता. या सामन्यात डिगंबर बडगुजर याने जास्त विकेट घेतल्या आणि सर्वात जास्त धावा गोविंद निंभोरे याने काढल्या. या विजयी संघाचे संस्थेचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, शाळेचे समन्वयक के.जी.फेगडे , शाळेचे प्राचार्य संदीप साठे यांनी अभिनंदन केले. विजयी संघासाठी क्रीडाशिक्षक आर. के. बढे, आकाश सराफ , अखिलेश यादव यांचे मार्गदर्शन लाभले.