Home क्राईम दिवसाढवळ्या धाडसी चोरी ! मेहरूण परिसरातील ८ हजारांचे लोखंडी पाईप लंपास

दिवसाढवळ्या धाडसी चोरी ! मेहरूण परिसरातील ८ हजारांचे लोखंडी पाईप लंपास


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील मदर टेरेसा शाळेसमोरील मोकळ्या जागेतून ८ हजार रूपये किंमतीचे लोखंडी पाईप व साहित्य अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी ३ वाजता घडली आहे. याप्रकरणी मंगळवारी ३ मार्च रोजी दुपारी ३ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील मेहरूण येथील मदर टेरेसा शाळेसमोरील मोकळ्या प्लॉटमध्ये प्रितम किरण महाजन रा. एसएमआयटी कॉलेज जळगाव यांच्या मालकीचे ८ हजार रूपये किंमतीचे लोखंडी सिकंजे आणि लोखंडी पाईप चोरून नेल्याची घटना २ मार्च रोजी दुपारी ३ वाजता समोर आली. ही चोरी संशयित आरोपी हुस्मेन फारूख पटेल (वय १९ रा. सुप्रिम कॉलनी, जळगाव) यांच्यासह त्याचा अनोळखी साथीदार यांनी चोरून नेल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी प्रितम महाजन यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी हुस्मेन फारूख पटेल (वय १९ रा. सुप्रिम कॉलनी जळगाव) आणि त्याचा साथीदार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच संशयित आरोपी हुस्मेन पटेल याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ किरण चौधरी हे करीत आहे.


Protected Content

Play sound