चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील गौर्या पाडा (उमरटी) येथे कोरोना संदर्भीय सामाजिक नियमांचे पालन करून परंपरागत कृषि विकास योजने अंतर्गत प्रशिक्षणाचे शनिवार ११ जुलै रोजी आयोजन करण्यात आले होते.
सेंद्रिय शेती संदर्भात प्रमाणीकरण पद्धतीची नोंदणी या उपक्रमात गौर्या पाडा गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित ग्रामस्थ पोलीस पाटील नानसिंग किसन बारेला, काशीराम बारेला, अमरसिंग धनसिंग पावरा, प्रेमसिंग बारेला, मांगिलाल चिराग्या बारेला,विजय रामजी बालेला, पुट्ट्या भिला बारेला, आपसिंग बारेला, सुभाष भिला बारेला, रावजी बारेला, जुडया बारेला आदी उपस्थित होते. गौरयापाडा येथील ग्रामस्थांना चोपडा मंडळ कृषी अधिकारी चेतन साळुंखे, उमरटी, कृषी सहाय्यक शिवदास बारेला तसेच कृषी विज्ञान केंद्र पाल येथील कृषी शास्त्रज्ञ महेश व्हि.महाजन यांनी मार्गदर्शन केले.