जागतिक एड्स दिन निमित्ताने विविध जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | १ डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून सर्वत्र पाळण्यात येतो, या दिवसाच्या निमित्ताने समाजात वेगवेगळ्या गटांमध्ये एच आय व्ही/ एड्स बद्दल जनजागृती व्हावी जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक समिती व सामान्य रुग्णालय जळगाव यांच्यातर्फे १ डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन व सप्ताह निमित्ताने प्रभातफेरी व विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

१ डिसेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीत विविध जनजागृतीपर कार्यक्रम जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंधक पथक, शासकिय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या मार्फत राबविण्यात येणार आहे. ज्यात कौटुंबिक तपासणी आणि गाव पातळीवरील शिबिरे या योजना नव्याने राबविण्यात येणार आहे.

१ डिसेंबर पासून जिल्ह्या व तालुकास्तरावर रांगोळी, चित्रकला स्पर्धा, जनजागृती प्रभात फेरी, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन , ट्रक चालक व वाहक तसेच निगडीत कर्मचारी यांचा मेळावा, स्थालांतरित लोकांसाठी कार्यक्रम, भगिनी मोळावा, एआयव्हीसह जगणाऱ्यांनकरिता वधू वर मेळावा, शासकिय योजनेच्या माहितीचा मेळावा आशा अनेक उपक्रमांचे आयोजन डिसेंबर महिन्यात करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.किरण पाटील यांनी दिली आहे.

Protected Content