जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ येथे तहसिलदार भुसावळ यांचे अध्यक्षते खाली शैक्षणिक विदयार्थ्यांना तहसिल कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालया मार्फत निर्गमित होणारे उत्पन्न दाखले, डोमोसाईल, नॅशनेलिटी, जातीचा दाखला, नॉन क्रिमीलेअर, EWS इत्यादी दाखले विहीत वेळेत उपलब्ध होणे कामी महा राज्यस्व अभियान अर्तगत शाळा महाविदयालयामध्ये विशेष शिबीर आयोजन करणे संबधी बैठक आयोजीत केलेली होती. सदर बैठकीस गटशिक्षण अधिकारी, शाळेचे मुख्याध्यापक, सेवा, सेतु केंद्र चालक हे उपस्थित होते.
१८ ते १९ जून २०२४ रोजी या कालावधीत खालील दिलेल्या वेळापत्रका प्रमाणे शाळा / महाविदयालयात दाखले बाबत विशेष शिबीर आयोजीत करणेत आलेले आहे. त्याचा तपशिल खालील प्रमाणे शिबीराचा दिनांक व वेळ – १८ जून, २०२४ शाळा / माहविदयालयाचे नाव – पि. ओ. नाहाटा कॉलेज भुसावळ, ङि एल. हिन्दी हायस्कूल भुसावळ, के. नारखेडे विदयालय भुसावळ, तहसलि कार्याल अधिकारी यांचे नाव – शोभा घुले नायब तहसिलदार, अंगद असटकर, नायब तहसिलदार, हेमंत गुरव, नायब तहसिलदार, सेवा चालकांचे नाव राहुल सपकाळे, राकेश चव्हाण, प्रमोद महाजन,
१९ जून, २०२४ रोजी दा.दे.ना. भोळे महाविदयालय भुसावळ, प.क. कोटेचा महिला महाविदयालय भुसावळ, महात्मा गाधी विदयालय, भुसावळ तहसलि कार्यालय अधिकारी यांचे नाव – शोभा घुले नायब तहसिलदार, अंगद असटकर, नायब तहसिलदार, हेमंत गुरव, नायब तहसिलदार, सेवा चालकांचे नाव आकाश ढाके, राकेश चव्हाण, सविता वानखेडे,
तहसिल कार्यालयातर्फे सर्व शालेय विदयार्थी व पालकांना अवाहान करण्यात येते की, शालेय प्रवेशाकरीता आवश्यक असलेले दाखले काढणे कामी आवश्यक ते कादपत्रासह शाळेच्या / महाविदयालयाच्या मुख्याध्यापक / संबधीत कर्मचारी यांच्याशी संपर्क साधुन दाखले वितरण शिबीराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन तहसिलदार भुसावळ यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.