Home क्राईम अश्लिल हातवारे व शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग

अश्लिल हातवारे व शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग

0
100


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका भागात राहणाऱ्या ४३ वर्षीय महिलेला अश्लिल हातवारे व शिवीगाळ करत तिचा विनयभंग केल्याची घटना शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील एका भागात ४३ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. शुक्रवारी २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान महिला ही घरी असतांना याच परिसरात राहणारा मिलींद विश्वनाथ पाटील याने महिलेला अश्लिल हातवारे व शिवीगाळ करत तिचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी रात्री १० वाजता संशयित आरोपी मिलींद विश्वनाथ पाटील रा. प्रेम नगर, जळगाव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्र पाटील हे करीत आहे.


Protected Content

Play sound