Home क्राईम घरातून रोकड चोरणाऱ्याला मोलकरणीला रंगेहात पकडले

घरातून रोकड चोरणाऱ्याला मोलकरणीला रंगेहात पकडले

0
104


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगरात राहत्या घरात कोणी नसल्याची संधी साधत २६ हजार रुपये चोरणाऱ्या मोलकरणीला घरमालक महिलेने रंगेहाथ पकडले. ही घटना शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली. याप्रकरणी सकाळी ११ वाजता मोलकरणीविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोनी हनुमान पवार (वय-२४, रा. शिवशक्ती नगर, जळगाव ) असे मोलकरणीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर परिसरात ॲड. अंजली भुसारी यांचे निवासस्थान असून शनिवारी २३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजता रोजी त्यांचे पती ॲड. केदार भुसारी हे मालेगाव येथे गेले होते. त्यावेळी ॲड. अंजली व त्यांच्याकडे काम करणारी सोनी पवार या घरी होत्या. काही कामानिमित्त घराबाहेर गेलेल्या ॲड. अंजली घरात परत आल्या तर मोलकरणीने कपाटातून २६ हजार रुपये काढून व कपाट पुन्हा लावत असल्याचे दिसले. तिला रंगेहाथ पकडून शहर पोलिसांना माहिती देण्यात आली. त्यावेळी पोलिस तेथे पोहचले व मोलकरणीला ताब्यात घेतले. याप्रकरणी ॲड. अंजली भुसारी यांनी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोनी पवार हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तिला अटक करण्यात आले आहे. पुढील तपास पोहेकॉ सतीश पाटील करीत आहेत.


Protected Content

Play sound