केसीई अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा

जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | येथील खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटी संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात, इंटरनल क्वालिटी अशुरन्स विभाग तर्फे २३ ते २७ मे २०२२ या कालावधीत पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशनवर शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्यात आली.

 

पाच दिवसीय ऑफिस ऑटोमेशन कार्यशाळेत अॅडव्हान्स एक्सेल तसेच अॅडव्हान्स वर्ड विषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी बदलत्या काळात मायक्रोसॉफ्ट ऑफिसचा उपयोग करून ऑफिस चे कामे सुलभ होण्यासाठी कसा करावा याविषयी सांगण्यात आले. प्राचार्य डॉ. संजय सुगंधी, उपप्राचार्य प्रा. संजय दहाड आणि इंटरनल क्वालिटी अशुरन्स विभागाच्या समन्वयक डॉ. प्रज्ञा विखार यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. प्रा. राहूल पाटील यांनी समन्वयक म्हणून काम बघितले. यामध्ये संस्थेतील २५ कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. जळगाव येथील सॉफ्टएड कॉम्प्युटर्स मधील स्वप्नां भावसार, अजय पाटील आणि मिलिंद सूर्यवंशी यांनी प्रात्यक्षिकाव्दारे उपस्थिताना मार्गदर्शन केले.

Protected Content