‘किनगाव’ येथे शिवसप्ताहाचे आयोजन

यावल, लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील किनगाव येथे इंग्लिश मेडीयम निवासी पब्लिक स्कूल व ज्युनिअर काँलेजमध्ये हिंदवी स्वराज्यचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे .

आठवडाभर चालणाऱ्या या कार्यक्रमाची सुरूवात सोमवार दि.२१ फेब्रुवारीपासून झाली. यात प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून पुजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास कळावा, जीवनात आलेल्या संकटांना कसे सामोरे जावे ? तसेच शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याविषयीची माहिती मिळावी. त्यांच्या मावळ्यांची माहिती मिळावी म्हणून शिव सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

पहिल्या दिवशी इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराज, जिजाऊ माता, सईबाई, तानाजी मालुसरे, ताराबाई असे अनेक पात्र प्रत्यक्षात वेशभूषा परिधान करून विद्यार्थ्यांसमोर मांडली. तसेच शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत पोवाडे व गीत तसेच चित्रकला स्पर्धा, किल्ला बनविणे अशा विविध स्पर्धांचे आयोजन या सप्ताहदरम्यान करण्यात आलेले आहे.

कार्यक्रमास चेअरमन विजयकुमार पाटील, सचिव मनिष पाटील, पुनम पाटील, प्रथमिक विभागाचे मुख्याध्यापक अशोक पाटील, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक संजय उधोजी, आदी. उपस्थित होते.

या कार्येक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोहिणी उधोजी, दिनकर पाटील, अरविंद सोनकुसरे, शाहरुख खान, रश्मी शेख, मिलिंद भालेराव, गोपाल चित्ते, दिलीप संगेले, राजश्री अहिरराव, संपत पावरा, हर्षल मोरे, सुहास भालेराव, वैशाली धांडे, भारती साठे, पवन महाजन, अनिल बारेला, सुनील चौधरी, भावना चोपडे,देवयानी साळुंखे, प्रतिभा धनगर, तुषार धांडे, नेहा धांडे, योगीता बिहारी, बाळासाहेब पाटील यांने परिश्रम घेतले.

Protected Content