कर्जबाजारीला कंटाळून माजी ग्रामपंचायत सदस्याची विहीरीत उडी घेवून आत्महत्या

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील माजी ग्रामपंचायत सदस्याने कर्जबाजारीला कंटाळून विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

विक्रम लालू भिरूड (वय-५३) रा. डोंगरकठोरा ता. यावल असे आत्महत्या केलेल्या माजी ग्रामपंचायत सदस्याचे नाव आहे.

विश्वसनिय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, “विक्रम भिरूड हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. ते डोंगरकठोरा ग्रामपंचायतीचे माजी सदस्य होते. त्यांच्यावर कर्जाचे डोंगर असल्याने गेल्या काही दिवसांपासून विवंचनेत होते. बुधवारी १३ एप्रिल रोजी सायंकाळी ६.३० वाजेच्या सुमारास डोंगरकठोरा शिवारातील सातोद रस्त्यावरील दिलीप भिरूड यांच्या शेतातील विहिरीत उडी घेवून आत्महत्या केली.

या घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील राजरत्न आढाळे यांच्याह ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली होती. आत्महत्या करण्यापूर्वी विहीरीच्या काठावर आपला चष्मा, शर्ट व चपल ठेवल्याचे दिसून आले. गावातील ग्रामस्थांच्या व तरूणाच्या मदतीने अखेर विक्रम भिरूड यांचे मृतदेह विहीरीतुन काढून यावल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. या संदर्भात मयताचे लहान भाऊ सुनिल भिरुड यांनी खबर दिल्याने यावल पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content