कर्जाने आश्रम शाळेचा बारावीचा निकाल ९९ टक्के

कर्जाने ता. चोपडा । येथील कै दादासो सुरेश जी पाटील उच्च माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ९९ टक्के लागला. १२ वी कला शाखेला ४८ विधार्थी बसले होते व ते सर्व विधार्थी उत्तिर्ण झाले असुन कला ह्या शाखेचा निकाल 100 टक्के लागला आहे.

विज्ञान शाखेला ५० विधार्थी परीक्षेला बसले होते त्या पैकी ४९ विद्यार्थी उत्तिर्ण झाले असुन विज्ञान शाखेचाही निकाल ९८ टक्के लागलेला आहे. कला व विज्ञान शाखेतील एकूण सर्व ९८ विधार्थी परीक्षेत बसले होते त्यापैकी ९७ विधार्थी उत्तिर्ण झाले असुन एकूण शाळेचा निकाल हा ९९ टक्के लागला आहे. त्यात प्रथम श्रेणीत४६ तर व्दितीय श्रेणीत ५० विधार्थी उत्तिर्ण झाले आहेत. विज्ञान शाखेत निशा वेड्या पाडवी ही ७१.२३ टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण झाली असुन अभिजित आपसिंग पावरा हा ७०. ७६ टक्के गुण मिळवुन व्दितीय आला. रविन सोनसिंग पावरा हा ६९.३८ टक्के गुण मिळवुन तृतीय क्रमांकाने उत्तिर्ण झाला. कला शाखेत काकड्या मोहीबा बारेला हा ७१.२३ टक्के गुण मिळवुन प्रथम तर रतन छगन पावरा ६६.१५ टक्के गुण मिळवुन व्दितीय तसेच अनिल धुंदर्या बारेला ६५.२३ टक्के गुण मिळवुन तृतीय आला आहे. यशस्वी विधार्थीचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष अँड भैयासाहेब संदिप सुरेश पाटिल ,सचिव डाँ स्मिता संदिप पाटिल तसेच उपअध्यक्ष सुरेश सिताराम पाटिल ,सह सचिव प्रा.डी बी देशमुख तथा प्राचार्य शरद छगन मोरे यांनी अभिनंदन केले आहे.

Protected Content