फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील जे.टी. महाजन अभियांत्रिका महाविद्यालयात “सायबर सेक्यूरीटी अवेरनेस, लाईव्ह अटॅक ॲण्ड इथिकल हॅकींग” या विषयावर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दर्जेदार शिक्षण, उच्च निकालाची परंपरा आणि अद्यावत सुविधांनी असलेले फैजपूर येथील जे.टी. महाजन अभियांत्रिकी महाविद्यालयातील कॉम्प्यूटर विभागाच्या वतीने पुण्यातील आरएमडी सिंहगड स्कूल ऑफ इंजिनिअरींगच्या सहकार्याने “सायबर सेक्यूरीटी अवेरनेस, लाईव्ह अटॅक ॲण्ड इथिकल हॅकींग” या विषयावर ऑनलाईन वेबीनारचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. या वेबिनारमध्ये सिंहगड कॉलेजातील कॅम्प्यूटर विभागाचे प्रा. विणा लोमटे, प्रा. सोनल फटांगरे, शुभम पाटील, प्रतिक जाधव आणि जे.टी.महाजन विद्यालयाचे प्राध्यापक सहभागी होणार आहे.