माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पतपेढीवर नितिन बारी बिनविरोध

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पी. एम. साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय, यावल येथील मुख्यलिपिक नितीन कालीदास बारी (भाऊसाहेब) यांची यावल तालुका माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सहकारी पतपेढी, यावल या पतसंस्थेत संचालक म्हणून बिनविरोध निवड झाली.

नितिन कालीदास बारी यांच्या माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर नोकरांच्या पतपेढीच्या संचालकपदी बिनविरोध निवडी बद्दल यावल नगर परिषद द्वारे संचलीत पी एम श्री साने गुरुजी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय यावलचे मुख्याध्यापक एम.के.पाटील यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी उपप्राचार्य ए .एस. इंगळे, पर्यवेक्षक व्ही.ए.काटकर, व्ही.टी नन्नवरे,ज्येष्ठ शिक्षक डी.एस.फेगडे, पी.एन. सोनवणे, एन. डी. नेवे यांचे सह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी उपस्थित होते.सर्वांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

Protected Content