भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली भोंदूबाबाकडून महिलेला मारहाण

बुलढाणा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महिलेच्या अंगातील भूतबाधा पळवून लावण्याच्या नावाखाली एका भोंदूबाबाने महिलेला मारहाण केल्याची घटना बुलढाणा जिल्ह्यातील घाटनांद्रा येथे घडली आहे. शिवाजी बर्डे उर्फ शिवा महाराज असे या महाराजाचे नाव आहे. त्यांनी एका महिलेच्या अंगातील भूत उतरवण्याच्या नावाने तिला मारझोड केली. पीडित महिला कोण आहे? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पण या घटनेचा एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला आहे.

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने या महाराजावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे याच महाराजाचा दारू सोडवण्याच्या नावाने एका व्यक्तीला मारहाण केल्याचाही एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणी राजेश राठोड नामक व्यक्तीने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Protected Content