जिल्ह्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन

जळगाव प्रतिनिधी ।  जिल्ह्यात पंडित दीनदयाल उपाध्याय जिल्हास्तरीय ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे 27 ते 29 ऑक्टोबर, 2021 दरम्यान आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील उद्योजकांनी एसएससी/एचएससी/पदवीधर/पदविकाधारक/एमई/बीई/कॉम्प्युटर ऑपरेटर/ आय.टी.आय सर्व ट्रेड पात्रतेची एकूण 205 रिक्तपदे भरण्याविषयी कळविलेले आहे. अशी माहिती वि. जा. मुकणे, सहाय्यक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

या मेळाव्यात नमूद पात्रता धारण केलेल्या ईच्छूक उमेदवारांनी सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, मेळाव्यात सहभागी होण्यासाठी विभागाच्या www.mahaswayanm.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या रिक्तपदांना ॲप्लाय करण्यासाठी सेवायोजन नोंदणी असलेल्या उमेदवारांनी आपल्या युजरआयडी व पासवर्डने लॉगईन करुन ॲप्लाय करावा. तसेच ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांनी विभागाच्या नमूद संकेतस्थळावर जाऊन नाव नोंदणी करावी व तद्नंतर आपल्या युजरआयडी व पासवर्ड ने लॉगईन करुन ॲप्लाय करावा.

याबाबत काही अडचण असल्यास कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक 0257-2959790 वर संपर्क साधावा, त्याचप्रमाणे मेळावा ऑनलाईन असल्याने उमेदवारांनी कार्यालयात अथवा नियोक्याकडे उक्त नमूद कालावधीत प्रत्यक्ष उपस्थित राहू नये, असेही श्री. मुकणे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

 

 

Protected Content