‘शुगर बीट’मधून इथेनॉल उत्पादन संदर्भात शेतकऱ्यांसाठी शिबिराचे आयोजन

वरणगाव प्रतिनिधी । गुरुपौर्णिमा व वनसंवर्धन दिनाचे औचित्य साधून कृषी विकास प्रकल्पावर शुगर बीट पासून इथेनॉल उत्पादन या विषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी (दि.२३) जुलै रोजी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 

या परिसंवादात करीता या विषयातील तज्ञ वासुदेव तोताडे हे खास अकोल्याहून मार्गदर्शन करण्यासाठी येणार आहे. भारत हा जगात तीन नंबरचा  तेल आयात करणारा देश आहे. तर भारताच्या बजेटमधील सर्वात जास्त पैसा तेल आयातीवर खर्च होतो. त्यामुळे भारतातील पैसा भारतातच राहावा, यासाठी भारत सरकारने आत्मनिर्भर योजनेअंतर्गत इथेनॉल निर्मितीचे प्रकल्प भारतात उभे करण्यासाठी सन 2023 पर्यत 7 हजार 500 रु गुंतवणूक करण्याची योजना असून जर भविष्यात ही योजना सफल झाली. विदेशातून आयात होणारे तेल 20 टक्के ने कमी होऊ शकते. तर या इथेनॉल निर्मितीच्या प्रकल्पांमुळे शेतकऱ्यांचाही आर्थिक फायदा होऊ शकतो कारण आता नवीन तंत्रज्ञानानुसार शुगर बीट पासून इथेनॉलची निर्मितीचा प्रकल्प जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे होणार असून शुगर बीट या पिकाचे उत्पन्न शेतकऱ्याने आपल्या एक एकर क्षेत्रात लावल्यास पाच महिन्यात 20 ते 25 टन एकरी उत्पन्न मिळू शकते. 

याविषयीच्या अधिक माहितीसाठी जळगाव जिल्ह्यात भुसावळ तालुक्यात वरणगाव येथे शुगर बीट पासून इथेनॉल निर्मितीचे फायदे व शुगर बीटचा लागवडीविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी अकोला येथील या विषयातील तज्ञ वासुदेव तोताडे सह मान्यवर  येणार असून ज्या शेतकऱ्यांना शुगरबीट लागवड  विषयी माहिती जाणून घ्यायची आहे त्या त्या शेतकऱ्यांनी या परिषदेला येण्यासाठी नाव नोंदणी या मोबाईल नंबर   9730218000  वर करुण संपर्क साधावा.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!