जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । “उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय @ – ” हा अभिनव उपक्रम कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे राबविण्यात यावा अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या वतीने पत्रकाद्वारे देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व शैक्षणिक संस्था यांच्या अडीअडचणीवर चर्चा करून त्या सोडवण्याच्या दृष्टीने “उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालय @ – ” हा अभिनव उपक्रम राज्यातील गडचिरोली, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, पुणे, सोलापूर, नांदेड, नाशिक, अमरावती, मुंबई इत्यादी ठिकाणी विविध विभागापासून उच्च व तंत्र शिक्षण विभागाने सुरुवात केली आहे.
सदर उपक्रमाच्या संबंधित विभागातील अकृषी विद्यापीठाने यशस्वीरित्या आयोजन केलं होतं. याच धर्तीवर जळगाव विभागाची मंगळवार, दि. २६ फेब्रुवारी २०२२ रोजी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथे सकाळी ११ वाजता उपक्रमाचे आयोजन करण्यात यावे अशा सूचना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयाच्या वतीने पत्रकाद्वारे करण्यात आल्या आहेत.