‘पत्रकार दिना’निमित्त अमळनेर येथे कार्यक्रमाचं आयोजन

अमळनेर प्रतिनिधी | मराठी पत्रकारितेचे जनक, आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहर व तालुका पत्रकार संघटनेच्या वतीने पत्रकार दिन सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दि 6 जानेवारी रोजी करण्यात आले आहे.

अमळनेर शहरातील अन्नपूर्णा मंगल कार्यालयाशेजारी पत्रकार संघाच्या नियोजित जागेत सकाळी १०.३० वाजता हा सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी तालुक्यातील लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी, सामाजिक व शैक्षणिक संस्थांचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. अमळनेर शहर व ग्रामीण भागातील सर्व पत्रकार बांधवानी या सोहळ्यास आवर्जून उपस्थिती द्यावी असे आवाहन अध्यक्ष चेतन राजपूत व सचिव चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.

 

Protected Content