बोदवड़ येथे जागतिक योगा दिनानिमित्त शिबिराचे आयोजन

बोदवड, प्रतिनिधी । येथील भारतीय जनता पार्टी तालुकातर्फे एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगाचे तज्ञ मार्गदर्शक जगदीश खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला सुरवात करण्यात आली.

योग भारतीय संस्कृतीने जगाला दिलेले अतुल्य शास्र… आज योगशास्त्र जगभरात पसरलं आहे. ते फक्त आपल्या देशाचे लाड़के पंतप्रधान श्री नरेंद्रभाई मोदीजी यांच्यामुळे त्यांनी जागतिक स्तरावर योग पोहचवला.. त्यांच्या अथक प्रयत्ना नंतर जगातील १७३ देशांनी आंतराष्ट्रीय योगा दिवस साजरा करायला सुरवात केली. मागील 6 वर्षांपासून 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो. केवळ आजारांवर मात करण्यासाठी नव्हे तर मानसिक आणि शारिरीक संतुलन ठेवण्यासाठी देखील ‘योग शास्त्राची’ एक महत्त्वाची भूमिका आहे. कोविड-१९ या महाभयंकर आजारात शरीरातील ऑक्सिजन लेवल आणि फुप्फुसांची कार्यक्षमता किती महत्त्वाचे आहे आणि त्यासाठी योग आणि प्राणायाम किती गरजेचा आहे तर कोरोना काळात योग आणि प्राणायाम शरीरासाठी खुप महत्वाचे आहे.

भारतीय जनता पार्टी, बोदवड़ तालूका तर्फे जागतिक योगा दिवस चे औचित्य साधुन बोदवड़ तालुक्यातील जनतेसाठी एक दिवसीय योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. योगाचे तज्ञ मार्गदर्शक जगदीश खंडेलवाल यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराला सुरवात करण्यात आली. त्यांनी लोकांना योग शिकवले व योगचे महत्व पटवून दिले. योग शिक्षक शेखरसिंग चौहान यांनी सुद्धा प्राणायाम चे धड़े दिले व महत्व सांगितले व बोदवड़ व्यापारी संघटनेचे अध्यक्ष गोपाल अग्रवाल यांनी लोकांना मार्गदर्शन केले. भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस अमोल देशमुख यांनी सुद्धा जनतेला योग दिनाचे महत्व सांगितले व पूर्ण योग शिबिराचे यशस्वी व्यवस्थापन केले. योग शिबिराचे बोदवड़ तालुक्यातील अनेक योग साधकांनी लाभ घेतला.

एक दिवसीय योग शिबिर यशस्वी करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ मार्गदर्शक अनंता कुलकर्णी, भाजपा जळगाव जिल्हा कोषाध्यक्ष अनिल खंडेलवाल, भाजपा बोदवड़ तालुकाध्यक्ष प्रभाकर पाटील, तालुका सरचिटणीस अमोल देशमुख, राजेंद्र डापसे, भाजपा शहराध्यक्ष नरेश आहूजा, शहर उपाध्यक्ष धनराज सुतार, नाडगांव गण प्रमुख सुधीर पाटील, चरणसिंग पाटील, भाजपा चित्रपट कामगार आघाडी तालुकाध्यक्ष उमेश गुरव, निलेश देशमुख व तसेच भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले असे भारतीय जनता पार्टीचे सोशल मिडिया प्रमुख रोहित अग्रवाल यांनी कळवले.

Protected Content