राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसतर्फे ‘स्वराज्य सप्ताह’ स्पर्धेचे आयोजन

यावल (प्रतिनिधी) | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांच्या सूचनेनुसार, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या मान्यतेने आणि पक्षाचे प्रदेश सरचिटणीस रविंद्र नाना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस रावेर लोकसभेचे जिल्हाध्यक्ष राकेश सोनार यांनी ‘स्वराज्य सप्ताह’ कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

स्पर्धांचे स्वरूप आणि नियम
या उपक्रमांतर्गत दोन विशेष स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. पहिली स्पर्धा ही वकृत्व स्पर्धा, तर दुसरी रील स्पर्धा आहे. दोन्ही स्पर्धा ऑनलाइन स्वरूपात घेण्यात येणार आहेत. स्पर्धेचा विषय “रयतेचं राज्य – शिवरायांचं” असा ठेवण्यात आला आहे. स्पर्धकांनी आपले भाषण किंवा रील व्हिडिओ तयार करून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत ७०२८२२७८०४ या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवायचे आहेत.

बक्षीस रक्कम व पारितोषिके :
वकृत्व स्पर्धेसाठी बक्षीसे: प्रथम पारितोषिक – ₹४००१/-, द्वितीय पारितोषिक – ₹३००१/-, तृतीय पारितोषिक – ₹२००१/- आणि रील स्पर्धेसाठी बक्षीसे: प्रथम पारितोषिक – ₹३००१/-, द्वितीय पारितोषिक – ₹२००१/-, तृतीय पारितोषिक – ₹१००१/- स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या विजेत्यांना ऑनलाईन पद्धतीने पारितोषिके वितरित केली जातील.

शिवरायांच्या विचारांचा जागर
ही स्पर्धा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा जागर घडवून आणण्यासाठी आणि युवकांमध्ये स्वराज्याबद्दलची जाणीव निर्माण करण्यासाठी आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे यामध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक व शिवप्रेमींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Protected Content