जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | मेहरूण येथील श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे भुलाबाई महोत्सव व नवरात्रीनिमित्त रास गरबा (दांडिया)चे विद्यार्थ्यांसाठी आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता.
संत ज्ञानेश्वर प्राथमिक व माध्यमिक विद्यालय येथे भुलाबाई महोत्सव व नवरात्री निमित्त रास गरबा (दांडिया)चे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात मुलांसोबत त्यांच्या पालकांनीही सहभाग नोंदवला होता. कार्यक्रमाचे नियोजन उपशिक्षक तथा संस्थेचे सचिव मुकेश नाईक यांनी केले. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी दांडिया खेळून कार्यक्रमात चैतन्य आणले. दांडिया खेळाची माहिती यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली.
मुख्याध्यापिका शितल कोळी, स्वाती नाईक, उज्वला नन्नवरे, साधना शिरसाट, रुपाली आव्हाड, नयना अडकमोल, साक्षी जोगी, दिव्या पाटील, आम्रपाली शिरसाट, पुजा अस्कर, सोनाली जाधव, मेघा सोनवणे, जयश्री खैरनार, शिल्पा कोंगे, मेघा सोनवणे,आदींनी सहकार्य केले.