ओरियन सीबीएससी शाळेत साउथ झोन २ बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन (व्हिडीओ)

जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी  ।  केसीई सोसायटी संचलित ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम शाळेत, केंद्रीय  माध्यमिक बोर्ड नवी दिल्ली यांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात प्रथमच सीबीएससी साउथ झोन २ बॉक्सिंग  स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.  या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यातील ३५० पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी होणार असल्याची माहिती शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

राष्ट्रीय सरावरील  सीबीएससी साउथ झोन २ बॉक्सिंग चार दिवशी स्पर्धेचे  आयोजन दि. १७  ते २० डिसेंबर २०२२ पर्यंत ओरियन सीबीएससी इंग्लिश मीडियम शाळेत करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्घाटन दि. १७ डिसेंबर २०२२ रोजी  सकाळी ११:०० वाजता जळगाव पोलीस अधीक्षक एम राजकुमार यांच्या हस्ते होणार आहे. याप्रसंगी केसीई संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे, संस्थेचे कोषाध्यक्ष डी टी पाटील, सदस्य हरीश मिलवाणी व शाळेच्या प्राचार्या सुषमा कंची तसेच महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे पदाधिकारी यांची उपस्थिती राहणार आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक आणि केरळ राज्यातील ३५० पेक्षा अधिक स्पर्धकसहभागी होणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या स्पर्धेचं उद्घाटन  दि. १७ डिसेंबर रोजी  व १८,१९ व २० डिसेंबर २०२२ या दिवशी बॉक्सिंग स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा सकाळी आठ वाजेपासून दुपारी तीन व त्यानंतर सायंकाळी सहा ते नऊ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी केसीई सोसायटी संचलित विविध विभागांची जसे एकलव्य क्रीडा विभागाचे श्रीकृष्ण बेलोरकर, ओजस्विनी कला महाविद्यालयाचे संचालक मिलन भामरे व संस्थचे इस्टेट मॅनेजर  कमलाकर पाटील यांची मदत घेतली जात आहे. या पत्रकार परिषदेला केसीई सोसायटी कोषाध्यक्ष डी. टी. पाटील व सांस्कृतिक समन्वयक शशिकांत वडदोरे उपस्थित होते.

Protected Content