जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | डॉ. उल्हास पाटील विधी महाविद्यालयात प्रथम वर्ष एलएलबी व प्रथम वर्ष बीए एलएलबी या विद्यार्थ्यांसाठी फ्रेशर्स पार्टी व नवागतांचे स्वागत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून शहरातील प्रसिद्ध विधीज्ञ जी एम पाटील हे उपस्थीत होते.
अॅड. जी एम पाटील यांनी नवेदीत विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत कायदेविषयक सखोल माहिती,वकिली व्यवसायातील बारकावे समजावून सांगत न्यायव्यवस्था ही लोकशाहीचा अतिशय महत्वाचा खांब असल्यामूळे प्रामाणिकपणे मेहनत करा यश तुमचेच असेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. नयना महाजन (झोपे ) या होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुमारी ऋतुजा भिडे ( व्व सनी कोर व्दीतीय वर्ष लॉ. यांनी केले. विद्यार्थ्यांनी विविध कला गुण दर्शनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी उपस्थित होते.