पिचर्डे येथे शेती कार्यशाळेचे आयोजन; शेतकऱ्यांना मार्गदर्शन

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावात शेतकऱ्यांसाठी शेती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. यावेळी विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले.

यावेळी कृषी विभागाचे कृषी सहाय्यक एस.टी. राठोड यांनी कापूस पिकावरील किडरोग व्यवस्थापन व मित्र किडीची ओळख या विषयी सखोल मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषी तंत्र व्यवस्थापक (आत्मा) श्री अमोल सोनवणे यांनी पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती तंत्र मिशन व शासकीय योजना बाबत उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

यावेळी कृषी विभागाच्या वतीने उपस्थित शेतकरी बांधवांना निंबोळी तेल वाटप करण्यात आले श्री गिरणाकाठ शेतकरी उत्पादक कंपनीच्या भागधारक सभासदांना १ रु पिक विमा योजनेचा लाभ देण्यात आला. पिक विमा पिक विमा फॉर्म जबाबदारी कंपनीचे सीईओ देवेंद्र माळी, अकाऊटंट विशाल धोबी यांनी पार पाडली. प्रास्ताविक व आभार कंपनीचे अध्यक्ष विनोद बोरसे यांनी केले आहे. शेती शाळेस गावातील ४० शेतकरी बांधव उपस्थित होते शेती शाळा अत्यंत उत्साहत यशस्वी रीत्या पार पडली.

Protected Content