बांबरूड येथील शेतकऱ्यांना मोसंबी व लिंबू पिकांबाबत मार्गदर्शन

पाचोरा प्रतिनिधी । बांबरुड (राणीचे) येथे शेतकऱ्यांचे कौशल्य विकसित वाढण्यासाठी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत मोसंबी व लिंबू पिकांच्या प्रशिक्षणात छाटनी, प्रतवारी, जमीन निवड व माती परीक्षण अशा विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. 

येथील प्रगतशील युवा शेतकरी मयुर अरुण वाघ यांच्या शेतात सदरचे प्रशिक्षण पार पडले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी पंचायत समितीचे सदस्य ललित वाघ तर प्रमुख पाहुणे म्हणुन शास्त्रज्ञ आर. एस. महाजन (प्राचार्य, कृषी पिलखोड) व प्रगतशील शेतकरी तुकाराम पाटील (देवळी), तालुका कृषी अधिकारी ए. व्ही. जाधव यांनी सखोल व कृषी विभागाच्या विविध योजना संदर्भात माहिती दिली. शिबिराचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक सचिन भैरव यांनी सूत्रसंचालन व मयूर वाघ यांनी उपस्थितांचे आभार मानले. त्याचबरोबर कृषि मंडळ अधिकारी के. एन. घोंगडे व बांबरुड, कुरंगी, सामनेर, नांद्रा परिसरातील शेतकरी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाबद्दल शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले.

Protected Content