भुसावळ प्रतिनिधी । वंचित बहुजन आघाडी पक्षातर्फे संपूर्ण महाराष्ट्र भर ‘संघटन समीक्षा व संवाद दौरा’ सुरू झाला असुन येत्या २९ जुलै रोजी जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे.
सदर दौऱ्याचे नियोजन करण्यासाठी पदाधिकाऱ्यांना पक्षादेश व काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शन करण्यासाठी शासकीय विश्रागृहावर दुपारी २:०० वाजता बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .सदर बैठकीचे अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष विनोद सोनावणे तर विशेष अतिथी म्हणून प्रमोद भाऊ इंगळे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) जळगाव उपस्थित होते.
सदर बैठकीचे सुरुवातीस दिनेश इखारे जिल्हा महासचिव ,विनोद इंगळे जिल्हा प्रवक्ता, रफिक बेग जिल्हा उपाध्यक्ष, शफी शेख जिल्हा उपाध्यक्ष, नितिन रणीत जिल्हा उपाध्यक्ष, महेंद्र सुरडकर जिल्हा उपाध्यक्ष,राजेद्र बारी जिल्हा संघटक ,सचिन बा-हे आय.टी जिल्हा प्रमुख , दिपक मेघे जिल्हासचिव, अरूण तायडे जिल्हा संघटक,बालाजी पठाडे चिटणीस कामगार आघाडी, आदी जिल्हा पदाधिकारी व मनोज कापडे यावल तालुकाध्यक्ष , सुपडा निकम बोदवड तालुकाध्यक्ष , बाळु शिरतुरे रावेर तालुकाध्यक्ष, पल्ला बाँस घारू भुसावळ ता. महासचिव, सचिन सुरवाडे जामनेर तालुकाध्यक्ष,देवदत्त मकासरे भुसावळ शहर महासचिव यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला त्या नंतर विनोद सोनावणे यांनी पदाधिकाऱ्यांशी हितगुज करताना जिल्ह्यात पक्षाचा येणारासंघटन समीक्षा व संवाद दौरा या साठी करावयाची तयारी आणि नियोजन या बाबत माहिती देत सदर दौरा यशस्वी करण्यासाठी तन ,मन,धनाने वंचित बहुजन आघाडी ,महिला आघाडी, संम्यक विद्यार्थी आंदोलन, सर्व पदधिकारी व कार्यकर्ते, बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांचे समर्थक व कार्यकर्ता कामाला लागा असा आदेश दिला.
पक्षाच्या या बैठकीस यावल,रावेर,भुसावळ,जामनेर,बोदवळ,मुक्ताईनगर तालुका,शहर पदधिकारी उपस्थित होते. बैठकीस उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार प्रदर्शन शहराध्यक्ष गणेशभाऊ जाधव यांनी केले