प्रज्ञा सातव यांच्या उमेदवारीला काँग्रेसमध्ये विरोध; सरचिटणीस अब्दुल हाफीजांनी दिला राजीनामा

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | काँग्रेसने आमदार प्रज्ञा सातव यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली आहे. पण आता त्यांच्या पक्षातूनच त्यांना विरोध होत असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अब्दुल हाफीज यांनी सातव यांच्या उमेदवारीला विरोध करत आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. या घटनाक्रमामुळे काँग्रेसचे अंतर्गत राजकारण पेटण्याची चिन्हे आहेत.

विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी येत्या 12 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी महायुती व विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचे एकूण 12 उमेदवार मैदानात आहेत. त्यात काँग्रेसने काँग्रेसचे दिवंगत माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना उमेदवारी जाहीर केली आहे. पण आता त्यांच्या उमेदवारीला महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेसमधूनच विरोध सुरू झाला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हिंगोलीचे नवनिर्वाचित खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी सर्वप्रथम सातव यांना उमेदवारी देण्यास विरोध दर्शवला होता. तशी विनंती त्यांनी एका पत्राद्वारे काँग्रेस हायकमांडकडे केली होती.

Protected Content