पाचोरा प्रतिनिधी । विरोधकांनी ६० वर्षात काहीही केले नसल्यामुळे त्यांना पंतप्रधान मोदी यांनी पाच वर्षात काय केले हे विचारण्याचा अधिकार नसल्याचे प्रतिपादन ना. गिरीश महाजन यांनी केले. ते येथील महायुतीच्या मेळाव्यात बोलत होते.
जळगाव लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारासाठी आज पाचोरा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी आपल्या मनोगतातून ना. गिरीश महाजन यांनी सर्वांगीण विकासाचे आश्वासन दिले. ते म्हणाले की, महायुतीचे सर्व घटक हे एकदिलाने काम करत असून यामुळे उन्मेष पाटील हे विक्रमी मतांनी विजयी होणार आहेत. दरम्यान, विरोधक आता पाच वर्षात काय केले असे विचारत आहेत. मात्र त्यांच्याकडे ६० वर्षे सत्ता असतांना त्यांनी काय केले हे आपण सर्वांनी पाहिले असल्यामुळे त्यांना याबाबत प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. दरम्यान, ना. महाजन यांनी आपल्या भाषणातून विविध विषयांना स्पर्श करून आमदार उन्मेष पाटील यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
पहा : ना. गिरीश महाजन नेमके काय म्हणालेत ते !