चंद्रकांत पाटील यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक

मुंबई प्रतिनिधी । महसूलमंत्री ना. चंद्रकांत पाटील यांनी बिल्डरला इमानी जमीन मिळवून देण्यासाठी मदत करत शासानाचा ४२ कोटींचा महसूल बुडविल्याचा आरोप करत विरोधकांनी आज त्यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक पवित्रा घेतला आहे.

कालच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर गैरव्यवहाराचे आरोप केले होते. राखीव व इनामी जमीन बिल्डरला मिळवून देण्यासाठी महसूलमंत्र्यांनी मदत केली असून यामुळे राज्य शासनाचा ४२ कोटींचा महसूल बुडाल्याचा आरोप त्यांनी केला होता. चंद्रकात पाटील यांनी कालच या आरोपाचे खंडण केले होते. मात्र आज विधीमंडळाची दोन्ही सभागृहे सुरू होण्याआधीच विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार निदर्शने केली. तर दोन्ही सभागृहातही यावरून वादळी चर्चा झाली. विधानसभेचे विरोधी पक्षनेते वडेट्टीवार,ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी सभागृहात चंद्रकांत पाटील यांच्यावर कारवाईची मागणी केली. यावेळी विरोधकांना यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची भूमिका सत्ताधार्‍यांनी घेतली असता विरोधकांनी यावरून आक्रमक भूमिका घेतली. विरोधकांना या प्रकरणी सभागृहात उत्तर देण्याचा अधिकार असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान, या प्रकरणी निर्माण झालेला पेच पाहता सभागृह १५ मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले आहे.

Protected Content